Swarajya Jan Parishad

whatsapp image 2025 08 23 at 6.12.55 pm (1)

स्वराज्य जनजागृती परिषदेचे उद्देश

  1. स्वराज्य जनजागृती परिषद स्थापन करण्यामागे अनेक उद्देश आहेत. आपल्या माहितीसाठी त्यातील काही उद्देश पुढे देत आहोत.
    परिषदेच्या माध्यमातुन व्यापक जनहित साध्य करणे.
  2. लोकशिक्षण आणि लोकजागृतीसाठी सातत्याने उपक्रम राबविणे. 
  3. नागरिकांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव निर्माण करून देणे. 
  4. जनतेच्या मुलभुत गरजांची पुर्तता करण्यासाठी तसेच सर्वांगीन विकासाला चालना देण्यासाठी काम करणे. 
  5. जनहिताच्या कायद्यांबाबत लोकजागृती करणे. कायदेविषयक शिबीरांचे आयोजन करणे. 
  6. शेतकरी, विद्यार्थी, नागरिक यांच्या प्रबोधनासाठी व्याख्याने, प्रवचने, बैठका, कार्यशाळा, अभ्यासवर्ग आयोजित करणे. 
  7. विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबविणे, तसेच शैक्षणिक चळवळीत गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे. 
  8. कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करणे. 
  9. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे. 
  10. राज्य घटनेतील तत्वांवर आधारित समाजाची उभारणी करणे. 
  11. जनतेला निर्भय आणि कार्यक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणे.

यासारख्या उद्देशांवर आधारित काम करण्यासाठी स्वराज्य जनजागृती परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. लोकांना जागृत करून आपले हक्क आणि अधिकार काय आहेत, यासाठी कसा लढा द्यावा लागतो, यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत का जात नाहीत ? या बाबत त्यांचे विचार जागृत करून कामाला लावणे. समाजातील सर्व चांगल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून एकजुटीने काम करणे, अशा व्यापक जनहिताच्या उद्देशाने हे संघटन स्थापन करण्यात आले आहे. “आज देशाला नेत्यांची गरज नाही, तर कार्यकर्त्यांची गरज आहे.” यासाठीच हे संघटन आहे.

Scroll to Top