Swarajya Jan Parishad

सभासदत्वासाठी निकष

whatsapp image 2025 08 23 at 6.15.07 pm
  1.  स्वराज्य जनजागृती परिषद स्थापन करून वेगवेगळ्या राज्यात, राज्यातील संपुर्ण विभागात तसेच जिल्हा, तालुका, गाव, वार्ड पातळीवर हे संघटन पोहोचविणे आवश्यक आहे. चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांशिवाय हे काम अशक्य आहे. त्यामुळे सभासद अर्ज करताना संबंधित नागरिकास या अर्जासोबत एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. 
  2. सभासदाला संघटन, कार्यालयीन, संशोधनात्मक, लेखन, कायदेविषयक, कार्यकर्ता प्रशिक्षण, सल्लागार, आंदोलन काळात सक्रीय सहभाग इत्यादी पैकी ज्या कामात आवड आहे, त्या कामात संधी दिली जाईल. 
  3. स्वत:चा व्यवसाय पार पाडुन कार्यकर्त्यांनी परिषदेचे काम करावयाचे आहे. सभासदाने तन-मन-धनाने कामात सहभागी व्हायचे आहे. संस्थेचे तत्व “व्यक्तिला नव्हे तर भ्रष्ट व्यवस्थेला विरोध” हे असल्याने कोणाविरूद्ध हेतु पुरस्सर कोणतीही कृती होणार नाही. 
  4. लोकशिक्षण, लोकजागृती आणि व्यवस्था परिवर्तनासाठी हे संघटन काम करत असल्याने रचनात्मक आणि धोरणात्मक कामासाठी सभासदाने काम करावयाचे आहे. 
  5. सभासद कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद, पदाधिकारी नसावा. त्याच प्रमाणे तो हिंसाचारी आणि जातीयवादी संघटनेचा सभासद नसावा. 
  6. सभासदाने सर्वांशी नम्रतेने आणि सामंजस्याने वागणे आवश्यक आहे. संस्थेच्या उद्दिष्ट आणि ध्येय्य धोरणाला कोणतीही बाधा येणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
  7. सभासदाने परिषदेच्या सर्व बैठका, मेळावे आणि कार्यक्रमांना हजर रहावे. तसेच सामाजिक काम हे राष्ट्रीय जबाबदारी म्हणुन करावे. 
  8. सभासदाने त्या-त्या भागातील चांगल्या लोकांचा शोध घेऊन संघटन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असते.
  9. प्रत्येक सभासदाने चारित्र्यसंपन्न नागरिकांची संख्या परिषदेच्या कामात जोडुन घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे देखील आवश्यक आहे. याशिवाय संघटन वाढ होत नसते.
Scroll to Top